मराठी माणसाला आत्मसन्मानाचा मार्ग दाखविणारी महान विभूती म्हणजे एकनाथजी ठाकूर : प्रा.अरुण मर्गज
बॅ. शिक्षण संस्थेत एकनाथ ठाकूर याना जयंतीनिमित्त अभिवादन
निलेश जोशी । कुडाळ : नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या माध्यमातून मराठी तरूणांना स्पर्धा परीक्षेत पास होऊन आत्मसन्मानाचा मार्ग दाखवणारी महान विभूती म्हणजे माजी खासदार कै. एकनाथ जी ठाकूर होय, असे उद्गार प्रा. अरुण मर्गज. यांनी काढले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा. अरुण मर्गज पुढे म्हणाले, एकनाथजी ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकारी बँक क्षेत्रातील सारस्वत बँकेची स्थापना करून तिला एक विश्वासू प्रतिष्ठा प्राप्त करून दिली .स्टेट बँकेच्या व्यवस्थापनामध्ये आपली एक वेगळी सभ्य व सुसंस्कृत अभ्यासू दूरदृष्टी असलेला हुशार व्यक्ती म्हणून एक इमेज तयार केली .राज्यसभेसारख्या संसदेच्या स्थायी सभागृहामध्ये एक अभ्यासू सुसंस्कृत प्रज्ञावान राजकारणी खासदार म्हणून एक नावलौकिक प्राप्त केला .त्यांच्या विचारांचा वारसा जतन करूया”. असे सांगत त्यांना आदरांजली अर्पण केली .
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था , चेअरमन उमेश गाळवणकर व सहकारी ज्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा जोपासत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शिक्षण संस्थेची वाटचाल करत आहेत. त्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथजी ठाकूर .त्यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांचा वारसा मुलांसमोर ठेवून ते जतन करण्याचं काम केले जात असते, असे प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितले.
यावेळी एकनाथ ठाकूर जयंतीनिमित्त नर्सिंग महाविद्यालयाच्या उप प्राचार्या कल्पना भंडारी, बॅ.नाथ पै बी. एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. योगिता शिरसाट , नर्सिंग महाविद्यालयाच्या नेहा महाले,प्रा ऋग्वेदा राऊळ व आणि विद्यार्थ्यांनी एकनाथ ठाकूर याना श्रद्धांजली अर्पण केली.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.