व्यापारी संकुलन होणार, आमदार नितेश राणे यांनी दिले अभिवचन

आमदार नितेश जी राणे अप्पासाहेब पटवर्धन चौकातील माऊली मित्र मंडळाचे नामफलका समोर दाखल झाले क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करून समस्त व्यापारी मित्र मंडळाचे वतीने स्वागत करण्यात आले,
*काल दिनांक ११/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ अप्पासाहेब पटवर्धन चौकातील सुलभ शौचालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी आपले लोकप्रिय आमदार नितेश जी राणे या यांनी समस्त व्यापारी वर्गा सोबत गप्पागोष्टी करत, हे व्यापारी संकुलन लवकरात लवकर बांधकाम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासकीय स्तरावर आपण प्रयत्न करून, आता ईथे असणारा माझा व्यापारी बांधव च भविष्यात याच ठिकाणी व्यवसाय करताना दिसले, असे म्हटले,
*सुलभ शौचालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री कंकाळ साहेब यांचे हि आमदार नितेश जी राणे यांनी कौतुक केले,
कणकवली नगरपंचायत ला भारत सरकारने स्वच्छता अभियानात अंतर्गत नामांकित केले,
*याचेच औचित्य साधून माऊली मित्र मंडळ व संलग्न जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते मुख्याधिकारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले,
*यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आम्हाला सार्थ अभिमान आहे, आमच्या कणकवली नगरपंचायत ला नामांकित करण्यात आले, आणि सर्व श्रेय मुख्याधिकारी व समस्त कर्मचारी वर्गाचे आहे, आणि म्हणूनच आम्ही आमचे कर्तव्य समजतो की, कंकाळ साहेब यांना गौरवण्यात आमची भावना एवढीच आहे, याही पेक्षा आमच्या कणकवली चे नाव संपूर्ण देशात एक आदर्शवत म्हणून व्हावे,
*यावेळी मुख्याधिकारी यांनी संपूर्ण व्यापारी मित्र मंडळाच्या जागेची पाहणी केली, आणि सर्व व्यापारी बांधवांना आश्वासित केले,
*उपस्थितीत सर्व पदाधिकारी व संलग्न मित्र मंडळाचे सदस्य, व्यापारी वर्ग यांनी साहेबांचे अभिनंदन केले, पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या,