प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १३ जानेवारी २०२४ रोजी

मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडे-पंचक्रोशी संचलित प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६.००वाजता सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री दशरथ म. कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर या कार्यक्रमाचे उदघाटन कुडाळ येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोघ चुबे हे करणार आहेत.तर या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त बँक अधिकारी श्री श्रीराम प्रभूखानोलकर, माणगांवचे प्राचार्य व सुप्रसिद्ध गायक किर्तनकार श्री प्रशांत धोंड,माजी विद्यार्थी व सिव्हिल इंजिनिअर श्री परिमल मांडकुलकर ,मालवण तालुका शिक्षक भारती तालुका अध्यक्ष श्री संजय जाधव तसेच माजी विद्यार्थीनी श्रीमती रेश्मा शेगले -वेंगुर्लेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे खास आकर्षण विद्यार्थी दशावतारी नाटक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री मयूर गवळी व तालरक्षक श्री हरेश नेमळेकर यांच्या साथीने संपन्न होणार आहे सोबत विद्यार्थ्यांनचे इतरही दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत तरी या विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून या आनंद सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत यांनी केले.
कुडाळ(प्रतिनिधी)