कणकवलीत विक्रेता विकास कार्यक्रम अंतर्गत परिसंवाद, चर्चासत्र
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय चे मंत्री नारायण राणे यांच्यासोबत केंद्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
कणकवली : सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार च्या वतीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम क्षेत्राची वाढ आणि विकासाची व्याप्ती तथा विक्रेता विकास कार्यक्रम या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद व प्रदर्शन आयोजित करण्यात आला आहे. हे प्रदर्शन २१ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार असून, त्यात केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांच्यासह मंत्रालयाचे राज्य मंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांच्या द्वारे उदघाटन कार्यक्रम होणार आहे. या व्यतिरिक्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाची ज्येष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या परिसंवाद कार्यक्रमात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाने विविध उपक्रमांची योजना जाखली आहे. ज्यात उदयम सहाय्य पोर्टल अंतर्गत सहायित अनौपचारीक सूक्ष्म उपक्रमांना प्रमाणपत्राचे वितरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हब (NSSH) अंतर्गत अनुसूचित जाती / जमाती लाभार्थाना प्रमाणपत्राचे वितरण नव्याने स्थापन झालेल्या जन समृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था सिंधुदुर्ग खादी संस्थेस चरखा आणि यंत्रमाग संकेतात्मक वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कोकण विभागातील यशस्वी उद्योजक व खादी व ग्रामोद्योग लाभार्थी यांचा पण सत्कार करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमात मराठी भाषेतील MSME योजनेची बुकलेट PMEGP ची बुकलेट व उद्योजकता कुशलता विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रमाण पत्राचे वितरण नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात PMEGP आणि ग्रामोद्योग लाभाथर्यासाठी १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ३ दिवसाचे प्रदर्शन, १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत कॉयर उत्पादनांवर 3 दिवसांचे प्रदर्शन आणि MSME-DFO कार्यालयाद्वारे विक्रेता विकास कार्यक्रम व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या परिसंवादात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली विकास आयुक्त कार्यालय नवी दिल्ली खादी या ग्रामउद्योग आयोग, नवी दिल्ली कॉयर बोर्ड कोची MSME-DFO मुंबई व भारत सरकारची उपक्रम व निर्यात संवर्धन संस्था जसे माझगांव डॉकयार्ड लिमिटेड IOCL BPCL. HPCL, Nuclear Power Corporation, Kokan Railway, Goa Shipyard, EEPC, Plex Council, IIP CEPET, IGTR, APEDA, GeM SIDBI व राष्ट्रीय बँका यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय परिसंवाद MSME योजनाबद्दल जागरुकता निर्माण करून तरुणांना उद्योजकतेसाठी प्रेरित करणे आणि आत्मनिर्भर भारताप्रती बांधिलकी मजबूत करणे हा उद्देश्य आहे. ही प्रदर्शने उद्योजकांसाठी त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक सुवर्ण संधी असेल अशी माहिती देण्यात आली.
दिगंबर वालावलकर कणकवली