कणकवली कॉलेज च्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन.

कणकवली/मयुर ठाकूर.

कणकवली महाविद्यालय कणकवली कनिष्ठ महाविद्यालय +२ स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,अभ्यास केंद्र कणकवली ७४०२A यांच्या वतीने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक येथे रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 ते शनिवार दिनांक 23 डिसेंबर २०२३ या कालावधीत ग्रामीण पुनर्रचना व समृद्ध भारतासाठी समृद्ध गाव या संकल्पनेवर आधारित निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. सौ. डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते झाले यावेळी कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे ,शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री ओम प्रकाश ताम्हाणेकर ,मुंबई कार्यकारिणी सदस्य विजय सातवसे ,मुख्याध्यापक मा.श्री .सतीश नेवाळकर ,उपसरपंच आयुबशा पटेल, कार्यकारिणी सदस्य सुनील घाडीगावकर ,ग्रामपंचायत सदस्या मा.सौ .उल्का घाडीगावकर ,मा. सौ. मंजुषा पारकर , मा. सौ पूनम तेली ,मा. सौ. अर्चना घाडीगावकर जिल्हा समन्वयक आणि पर्यवेक्षक प्राध्यापक के .जी जाधवर, कार्यक्रमाधिकारी प्रा.विजय सावंत, कार्यक्रमाधिकारी प्रा.मनोज कांबळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ. सावंत व्हीं .एस, प्रा. सौ. सावंत पी एम , प्रा. ढवळे एस एस. लिपिक वैभव राणे आदी उपस्थित होते
या शिबिरामध्ये प्राधान्याने२९ मुले व ३६मुली असे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत .या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.राजश्री साळुंखे मॅडम यांनी सांगितले की युवा पिढीवर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत व स्वयंसेवकांनी पर्यावरणाबद्दल जागरूक असले पाहिजे.
यावेळी प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अध्यक्षीय भाषणात युवा पिढीला प्रोत्साहन देणारे विचार मांडले .तसेच अशा शिबिरातून मुलांमधील नेतृत्व गुण वाढीस लागतात असे सांगितले .शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री .ओमप्रकाश ताम्हाणेकर यांनी त्यांच्या काळातील महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. मा.मुख्याध्यापक श्री सतीश नेवाळकर यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्या मा.सौ पूनम तेली यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या .जिल्हा समन्वयक पर्यवेक्षक मा. प्रा.के .जी .जाधवर सर यांनी समाजाच्या विकासामध्ये विद्यार्थी चळवळीला महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय सावंत यांनी केले प्रास्ताविक प्रा. मनोज कांबळे यांनी केले तर आभार प्रा. सौ .पी. एम सावंत यांनी मांडले.

error: Content is protected !!