भा. दं. सं.कलम 353,332,324,324 च्या गुन्ह्यांमधून कुडाळ येथील सहा जणांची निर्दोष मुक्तता
लक्ष्मीवाडी, कुडाळ, नवीन एस.टी. स्टॅण्डसमोर मुंबई गोवा हायवे रोडवर ता. कुडाळ येथे दिनांक ०८/०३/२०१९ रोजी
फिर्यादी प्रकाश शेडेकर उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे ठिकाणी उपविभागीय अभियंता म्हणून नियुक्त होते धोंडी आळवे वगैरे सहा हे आरोपीत फिर्यादी यांचे सहकारी तसेच इतर कामगार यांचे सह महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना आरोपी यांनी बेकायदेशिर जमाव करुन हातात लाकडी दांडे काठ्या घेवून येवून फिर्यादी करीत असलेले केंद्र शासकीय काम बंद पाडून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालून त्यांचे अंगावर धावून गेले व आरोपी यांनी त्यांचे हातातील लाकडी दांडा घेवून फिर्यादीचे डोकीवर मारताना फिर्यादीने सावध होवून तो वार आपले हाताने अडवीला. तेव्हाच इतर आरोपी यांनी फिर्यादी सोबत असलेले सहकारी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे श्री रविकुमार वाकालापूरी व सतीशचंद्र यादव यांना काठीने मारहण केली. त्यावेळी साक्षीदार सतीशचंद्र यादव यांचे हातास दुखापत झाली म्हणुन त्याचेविरुध्द भादंवि क३५३,३३२.३२४, ३२३,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या वकिलांच्या वतीने एकूण फिर्यादी सह एकूण आठ साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात आली. हे प्रकरण सिंधुदुर्ग येथील जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश देशमुख मॅडम यांच्या कोर्टात कामकाज चालले. आरोपी यांच्या वतीने त्यांची बाजू मांडण्याचे काम ॲड.अमोल सामंत, ॲड. हितेश कुडाळकर ,ॲड. जान्हवी तायशेटे या सर्वांनी काम पाहिले. दिनांक ११/१२/२०२३ रोजी धोंडू आळवे व सहा जणांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश २ देशमुख मॅडम यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली .
कुडाळ (प्रतिनिधी)