बालमंदिर कनेडीचा कु अर्णव अभिषेक शिरसाट राष्ट्रीय पातळी वर प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर.

बालमंदिर कनेडी प्रशालेचा अर्णव अभिषेक शिरसाट इयत्ता पहिली हा रंगोत्सव स्पर्धेत राष्ट्रीय पातळी वर पाहिला आलेला असून त्याला राष्ट्रीय पातळीवरील आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त झालेले असून त्याची अंतरराष्ट्रीय पातळी वरील रंगोत्सव स्पर्धे साठी निवड झालेली आहे. अर्णव अभिषेक शिरसाट हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजनी बुवा अभिषेक शिरसाट (गाव हरकुळ बुद्रुक) यांचा मुलगा आहे. या स्पर्धे मध्ये बालमंदिर प्रशालेच्या 10 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व चार विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल प्राप्त झालेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष श्री. सतीश सावंत, उपाध्यक्ष पी. डी. सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत, चेअरमन आर एच सावंत मुख्याध्यापक सुमंत दळवी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!