तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित*आयडियल इंग्लिश स्कूलचे यश.

कणकवली/मयुर ठाकूर.
वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथे नुकत्याच पार पडलेल्या 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश मिळवले आहे ९ वी ते १२ वी गटात ज्युनिअर कॉलेजच्या श्रावणी मराठे व मेहविश शेख यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे , उपाध्यक्ष श्री मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर खजिनदार सौ .शितल सावंत मॅडम सल्लागार डी.पी तानवडे सर आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे