आमदार नितेश राणेंच्या शिफारशीने 53 कोटी 62 लाखांच्या 52 कामांना मंजुरी

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या शिफारशीने 38 कोटी 35 लाखाच्या 5 कामांना मंजुरी

कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण मध्ये विकास कामांचा धडाका

केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने पुरवणी अर्थसंकल्पीय अनुदान डिसेंबर २०२३ अंतर्गत रस्ते व पूल या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून देण्यात आला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी प्राप्त करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे सद्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार नितेश राणे यानी शिफारस केलेल्या ५३ कोटी ६२ लाख रूपयांच्या ५२ कामांना मंजूरी देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी शिफारस केलेल्या ३८ कोटी ३५ लाख रूपयांच्या ६ कामांनाही मंजूरी देण्यात आली आहे.
यामुळे कणकवली, देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील दळणवळणाची अत्यंत महत्त्वाची व प्रलंबित रस्ते व पूलांची कामे मार्गी लागणार आहेत. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात येत आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!