कणकवली फ्लायओव्हर ब्रिजखालील जागा वाटपात नगराध्यक्ष यांच्या कार्यकर्त्याना झुकते माप

भाजपा युवा मोर्चा शिष्टमंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

स्थानिक मराठी भूमिपुत्रांना न्याय द्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा

कणकवली नगरपंचायतीतर्फे हायवेच्या पुलाखालील भाजी व फळ विक्रेत्यांना दुसऱ्या पुलाखाली जागा देण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, त्याबाबत स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय होत असल्याच्या गंभीर तक्रारी भाजप युवा मोर्चाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप युवा मोर्चा कणकवली शहर च्या वतीने स्थानिक मराठी आणि भूमिपुत्रांना या जागा वाटप मध्ये 100% प्राधान्य द्यावी अशी मागणी युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे परप्रांतीयांना जागा देण्यास सक्त विरोधः कोणत्याही परप्रांतीय विक्रेत्याला या ठिकाणी स्टॉल किंवा जागा देण्यात येऊ नये. स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारावर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप युवा मोर्चा तो खपवून घेणार नाही.नगराध्यक्षांच्या मर्जीतील कार्यकत्यांची मनमानी थांबवा पुनर्वसनाच्या नावाखाली नगराध्यक्षांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी तीन चार स्टॉल वाटप केले जात असल्याचे समोर येत आहे. हा सामान्य आणि गरजू स्थानिक विक्रेत्यांवर उघड-उघड अन्याय आहे. एकाच व्यक्तीला बहुसंख्य जागा देण्याची ही चुकीची पद्धत तात्काळ थांबवून प्रत्येक गरजू स्थानिक विक्रेत्याला एकच जागा या न्यायाने वाटप झाले पाहिजे. नगरपंचायतीने राजकीय दबाव झुगारून पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि स्थानिक तरुणांच्या हिताचा विचार करूनच या जागांचे वाटप करावे. जर स्थानिक भूमीपुत्रांना डावलून परप्रांतीयांना किंवा विशिष्ट सत्ताधारी कार्यकत्यांचे उदरभरण करण्याचा प्रयत्न झाला, तर भाजप युवा मोर्चाच्या वतीने नगरपंचायतीविरोधात तीव्र ‘स्थानिक हक्क आंदोलन’ छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. यावेळी यूवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे नगरसेवक स्वप्निल राणे शहर उपाध्यक्ष मंदार सोगम सरचिटणीस मुन्ना परब जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे चिटणीस गणेश तळगावकर चिटणीस ऋतिक नलावडे, प्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!