रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे 16रोजी कथाकथन स्पर्धा
रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर तर्फे इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी शनिवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा श्रीमती रजनी ठाकूर व विजयालक्ष्मी ठाकूर यांनी प्रायोजित केली आहे. यासाठी साहसी कथा हा विषय आहे. नावनोंदणी ची अंतिम तारीख 14डिसेंबर असून अधिक माहितीसाठी सौ विनिता कांबळी 02365 246017 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
आचरा, अर्जुन बापर्डेकर