समाजाचा पायाभूत विकास करणे हेच माझे ध्येय

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई – शाखा सिंधुदूर्गचे अध्यक्ष – श्री . चंद्रकांत रामचंद्र ( सी . आर . ) चव्हाण यांचा मनोदय

दिगवळे रांजणवाडी येथे चर्मकार समाजासाठी स्मशानशेड मंजुरीने दिला पायंडा घालून मौजे – दिगवळे – रांजणवाडी येथे चर्मकार समाजाची घरे आहेत . रांजणवाडीसाठी शासनाने सार्वजनिक स्मशान शेड बांधलेली आहे.
पण ! मेल्यावरही जात नाही ती जात ! याचा अनुभव माझ्या समाजाला आला व येत आहे.
रांजणवाडी येथील रहिवाशी श्री. संतोष बाळकृष्ण जाधव . यांचे वडील कै. बाळकृष्ण जाधव .यांचे वृद्धापकाळाने गेल्यावर्षी दि. ५ ऑक्टोबर २२ रोजी निधन झाले. ते दिवस ढगफुटी सदृष्य पावसाचे होते.
त्यांच्या वडीलांचे अंतिम संस्कार शासकीय शेड असूनही उघड्यावर भर पावसात करण्याची वेळ आली.
याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्री. सी. आर . चव्हाण होते.
श्री. संतोष बाळकृष्ण जाधव . हे त्यांचे धाकटे चिरंजीव . ते त्यावेळी जि.प. सेवेत होते. जे आज भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई शाखा – सिंधुदुर्ग या संघटनेचे सर चिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मनाला ही बाब फारच चटका देऊन गेली. त्यांनी त्याबाबतचे प्रत्यक्षदर्शी फोटोसह ग्राम पंचायत दिगवळे सरपंच व ग्रामसेवक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
त्यानंतर त्यांनी मा . तहसिलदार कणकवली , मा. गटविकास अधिकारी कणकवली यांचेशी चर्चा करून आपली कैफियत मांडली.
मा. गटविकास अधिकारी श्री. अरुण चव्हाण साहेब , मा. विस्तार अधिकारी श्री. वारंग साहेब यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करणेबाबत ग्रामसेवक श्री. गर्कळ यांना आदेश दिले. प्रस्ताव सादर झाला . पण बांधकाम विभागात जवळ – जवळ आठ महीने estimate साठी पडून होता. त्यानंतर ही बाबत मा. अध्यक्ष सी.आर चव्हाण व सरचिटणीस श्री. संतोष जाधव यांनी वारंवार बांधकाम विभाग यांची भेट घेऊन प्रस्ताव मा. समाजकल्याण अधिकारी ओरोस यांचेकडे सादर केला . पण आर्थिक वर्ष अखेरीस प्रस्ताव सादर केल्याने मंजुरी मिळाली नाही.
पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने मा. मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना प्रस्तावाच्या प्रतीसह निवेदन देण्यात आले. व त्याच्या प्रती मा . जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग व मा. पोलीस अधिक्षक सिंधुदूर्ग यांच्या भेटी घेऊन निवेदने देण्यात आली .
पुन्हा फेर प्रस्ताव सादर करण्याचे समाजकल्याण अधिकारी यांनी सूचविले. मा. गटविकास अधिकारी चव्हाण साहेब व वारंग साहेब यांनी ग्रामसेवकास फेर प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले.
दिगवळे ग्रामपंचायतचे सरपंच मा. संतोष घाडीगावकर व उपसरपंच मा. तुषार गावडे यांनी ही मोलाची मदत केली व विनाविलंब प्रस्ताव सादर करण्यात आला. मंजुरीसाठी मा. अध्यक्ष सी.आर . चव्हाण व सरचिटणीस श्रीं . संतोष जाधव यांनी वारंवार भेटी देऊन मंजुरीबाबत पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून
मा. मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदूर्ग यांनी सदर प्रस्तावास *दिनांक-20/11/23 च्या आदेशाने अग्रक्रमाने मंजुरी दिली आहे.व समाजाची खरी अडचण सोडविली आहे.
अध्यक्ष या नात्याने श्री. सी.आर .चव्हाण यांनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी नायर साहेब , मा. तहसिलदार कणकवली , मा. गटविकास अधिकारी -अरुण चव्हाण साहेब , मा. विस्तार अधिकारी ग्रामपंचायत – वारंग साहेब त्याज बरोबर दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर उपसरपंच श्री. तुषार गावडे व ग्रामसेवक गर्कळ यांना विशेष धन्यवाद देऊन त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले.
असेच बहुजन समाजाच्या पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी सदोदीत सहकार्य करावे अशी त्यांनी भावना व्यक्त केली.
मा . सरपंच ग्रामपंचायत दिगवळे यांनी ही मंजुर स्मशान शेड तात्काळ व उत्कृष्ट दर्जाची बांधून समाजाची समस्या दूर करावी असे आवाहन मा. अध्यक्ष चव्हाण यांनी संघटनेच्या वतीने केले आहे.

error: Content is protected !!