आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार

नौदल दिनानिमित्त बाहेरील पोलीसांची केली होती व्यवस्था
आचरा-अर्जुन बापर्डेकर नौदल दिनानिमित्त बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या पोलीसांच्या व्यवस्थेसाठी आचरा येथील सहकार्य दिलेल्या हॉटेल व्यावसायिकांचा सत्कार आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी आचरा पोलीस स्टेशन येथे केला. यावेळी त्यांनी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मंगेश टेमकर, निलेश सरजोशी,गोलतकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
नेव्ही डे बंदोबस्त दरम्यान आचरा पोलिस ठाणे हद्दीत बाहेरून आलेल्या बंदोबस्त मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या राहण्याच्या व नाश्त्याच्या व्यवस्थापनेत मदत करणारे हॉटेल डेपोडील्स , लौकिक हॉलचे , कमल व्हिल्ला,माऊली रिसॉर्ट आणि हॉटेल परिस्का चे मालक यांचा पोलिस ठाणे येथे सत्कार करून आभार मानण्यात आले.




