तुम्बलेली, वाहणारी गटारे आणि खाजगी गडगे रंगविण्यात धन्यता मानणारे नगरपालीका प्रशासन..

मोदी आणि इतर मान्यवरांच्या स्वागतासाठी एकीकडे मालवण नगरी सजत असताना मालवणच्या भर बाजारपेठेत मात्र वाहणाऱ्या टाक्या आणि तुंबलेल्या गटारांचा प्रादुर्भाव आहे..

वरील छायाचित्रात दर्शविलेली गटाराची टाकी दिवाळी पासून वाहत असून ती साफ करण्यास प्रशासनाला वेळ नाही.. असे चित्र आहे..

याविषयी संबंधित आस्थापनेच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता, टाकीच्या सफाईचे पैसे आम्ही नियमित भरत असून देखील, प्रशासन महिनोन्महिने आमच्या तक्रारीची दखलच घेत नाही असे उत्तर देण्यात आले..

मोदींच्या मालवण भेटीच्या पार्श्वभूमीवर मालवणची सफाई केली जाईल, पण अधिकाऱ्यांच्या मुजोरीची सफाई कधी होणार असा सवाल विचारला जात आहे..

error: Content is protected !!