रेशन दुकांदारांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 1 डिसेंबर 2023 रोजी धरणे आंदोलन

1 जानेवारी पासून देशव्यापी व राज्यव्यापी स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवणार
जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांची माहिती
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाच्या आणि सातत्याने दुर्लक्ष केल्या जात असलेल्या आपल्या विविध मागण्या आणि अडचणींना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने 1 डिसेंबर 2023 वार शुक्रवार रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांच्या उपस्थिती मध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली.
सर्वप्रथम हे आंदोलन जरी रेशनदुकानदार करणार असले तरी हे आंदोलन आहे सर्वसामान्य रेशनकार्ड धारकासाठी. हि रेशन व्यवस्था टिकावी मजबूत व्हावी या महाभयंकर महागाई पासून सर्वसामान्यांना थोडा तरी दिलासा मिळावा, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू त्याच बरोबर कोविड सारख्या महामारीच्या काळात स्वतः सह संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालून संपूर्ण जग घरात बसून असताना रेशन दुकानदार मात्र शासनाच्या विविध योजनांचे धान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करत होता. परंतू त्याची कोणतीही दखल शासनाला घ्यावीशी वाटली नाही. महागाईचा उच्चांक झालेला असताना दुकानदार मात्र तुटपुंज्या कमिशनवर आपल्या कुटुंबाची गुजराण करताना मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे शाश्वत उत्पन्नाच्या हमी शिवाय पर्याय नाही. त्याच बरोबर पॉस मशिन सव्र्व्हर पारंपरिक प्रशासकीय तांत्रिक अडचणी यामुळे दुकानदाराला जगणे नकोसे झाले आहे.
या सर्व बाबीविरुध्दचा लढा हा डिसेंबरच्या आंदोलनापासून सुरू होत असून हा रेशन दुकानदारांच्या न्याय्य हक्कांसाठी जगण्याचा लढा आहे. यापूर्वी ज्याप्रमाणे आपल्याकडील केरोसीन व्यवसाय संपुष्टात आणून 55000 कुटुंब रस्त्यावर आली आणि त्याची कसलीच दखल शासनाने घेतली नाही., तसेच लोकप्रतिनिधी एक शब्दही याबाबत आजपर्यंत कधी बोलले नाही. रेशन दुकानदार एकसंघ नसल्यामुळे काहीही करू शकले नाही. ती वेळ पुन्हा आपल्यावर येवू नये, यासाठी संघटीत होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनच्या वतीने आपल्या संघटनेचे महासचिव श्री. विश्वंभरजी बस कॅन्सर आजाराने आजारी असताना व त्यांचे मोठे ऑपरेशन झालं असतानाही देशभरातील परवानाधारकांसाठी आपल्या तब्येतीची तमा न बाळगता आपल्यासाठी लढण्यासाठी सज्ज झाले असून केंद्रीय पातळीवर केंद्र सरकारने आपण लाखोंच्या संख्येत मोर्चा, धरणे आंदोलन, चर्चा करूनही काहीच निष्पन्न झाले नसल्यामुळे नाईलाजास्तव देशव्यापी 1 जानेवारी 2024 पासून देशभरातील स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दि. डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023 देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून काम करतील. तसेच 16 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत देशभर पुढील आंदोलनासाठी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर सभा आंदोलन, द्वारभेट, लोकप्रतिनिधना निवेदन देणे इ. कार्यक्रम राबवतील व जानेवारी 2024 पासून पुढील आदेश येईपर्यंत आपली दुकाने बंद ठेवतील. तसेच दि. 16 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे रामलिला मैदानावरून संसद भवनावर मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना आपले निवेदन सादर करतील.अशी माहिती श्री पेडणेकर। यांनी दिली.
दिगंबर वालावलकर, कणकवली