येणार्या निवडणूकीत सावंतवाडी विधानसभा ताब्यात घेणारच

आदित्य ठाकरे; खोके सरकार गडगडणार
घाबरट म्हणून निवडणूका घेतल्या जात नाहीत
विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी ताब्यात घेणार, असा दावा आज येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करीत नितेश राणेनी केलेल्या खळा बैठकीच्या टिकेवर त्यांच्यावर काय बोलणार,हे सरकार घाबरट आहे. त्यामुळे कालावधी संपला तरी निवडणूका घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे प्रशासकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार सुरु आहे. त्यामुळे येणार्या काळात त्यांना जनता आणि विशेषतः शिवसैनिक नक्कीच जागा दाखवून देतील अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
श्री.ठाकरे हे आज सावंतवाडी या ठिकाणी आले होेते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना सावंतवाडीच्या जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी सावंतवाडीची जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. त्या दृष्टीने आमची मोर्चेंबांधणी सुरू आहे.येथील तिन्ही विधानसभेसह लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी युवा नेते वरुण सरदेसाई, पदवीधर मतदार संघाचे यंत्रणा प्रमुख किशोर जैन, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, शैलेश परब, बाळा गावडे, संजय पडते, अतुल रावराणे, संदेश निकम, रुपेश राऊळ, संदिप मालकर, संदीप गवस, शिवदत्त घोगले, निशु पड़ते, रूपेश परब, नामदेव नाईक, भरत सावंत, मेघशाम काजरेकर, पप्पू ठिकार, सागर धुरी, सुशांत ठाकुर, कुलदीप राऊळ, सुनील साईल, चंदा परब, गोपालकृष्ण फोंडबा, संजय धुरी, निलेश परब, सुधा चव्हाण, शैलेश टिळवे, संजय परब, रमाकांत राऊळ, पुरोषोत्तम राऊळ, बाबूराव चव्हाण, रामकृष्ण शिंदे, योगेश करमलकर, मारिया डिमेलो, साक्षी घोगले, सुलभा नाईक, अनीशा नाईक, उज्वला सावंत, निशा पड़ते, संतोष राऊळ, शिवा परब, योगेश रेडकर, सोनू कासार, महादेव राऊळ आदी उपस्थित होते.
सावंतवाडी, प्रतिनिधी