सावंतवाडी विधानसभेतील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी विधानसभेतील ८ ग्रामपंचायत निवडणुक झाल्या त्यापैकी ५ सरपंच व ३० सदस्य निवडून येऊन मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपा एक नंबर वर असल्याचे सिद्ध केले .सर्वप्रथम सावंतवाडी विधानसभेच्या वतीने आम.श्रीकांत भारतीय यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , प्रदेश का. का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई , मुख्यालय प्रभारी व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई , महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर , मनोज नाईक , निलेश सामंत , वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप , साईप्रसाद नाईक , रविंद्र मडगांवकर , सुहास गवंडळकर , युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली , महीला मोर्चा प्रदेश का. का.सदस्या मोहीनी मडगांवकर , रमेश दळवी उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीकांत भारतीय म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने व मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारने आपल्या कामाने जनतेमध्ये विश्वास निर्माण केला आहे. भाजपा कडे सत्ता दिल्यास आपल्या गावचा विकास होऊ शकतो , अशी खात्री वाटली व त्यामुळेच भाजपा निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला . विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकरर्त्यांचे अभिनंदन करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हिच विजयाची परंपरा कायम ठेवा , असे आवाहन केले .
यावेळी सावंतवाडी विधानसभेतील बहुसंख्य सरपंच व उपसरपंच , लोकप्रतिनिधी व पदाधिकारी , विविध सेलचे पदाधिकारी , सुपर वॉरियर्स , शक्तिकेंद्र प्रमुख , बुथप्रमुख तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केले.
सावंतवाडी, प्रतिनिधि





