आम. रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील कार्यकर्ते पदाधिकारी यांची घेतली भेट

दिवाळी फराळ भेट वितरित करून सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

खारेपाटण मधील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लावणार -आम. रवींद्र फाटक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेपर्यंत पोहचविण्या बरोबरच खारेपाटण मधील विकासकामाचे असणारे प्रमुख प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,कणकवली,देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उपजिल्हा प्रमुख बापू धुरी, शिवदुत योजनेचे जिल्हा समन्वयक प्रतीक भिसे,महीला आघाडी उपजिल्हा प्रमुख सौ नंदिनी पराडकर, कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव,खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, ग्रा.पं.सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, सौ.अस्ताली पवार,खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुहास राऊत,कार्यकर्ते श्री लियाकत काझी, शारुख काझी,बब्या खांडेकर,सचिन शिंदे आदी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आमदार रवींद्र फाटक हे आज शनिवारी खारेपाटण येथील शिंदे गटाच्या शिवसेना पक्ष कार्यालय कार्यकर्त्यांची भेट घेण्याकरिता व त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांना दिवाळी भेट वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथून करण्यात आला.यावेळी त्यांचा खारेपाटण येथील पदाधिकारी यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभहस्ते सर्व कार्यकर्त्यांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. यावेळी खारेपाटण मधील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे ऐतिहासिक शहर असून मा.मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून देऊन खारेपाटण मधील प्रलबित असलेली सर्व विकासकामे कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थ व पदाधिकारी यांना दिले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!