कोकण नाऊची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद – माजी खासदार निलेश राणे

कोकण नाऊ प्रीमियर लीगचे निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

कार्यक्रमाच्या नियोजनचे केले भरभरून कौतुक

प्रतिनिधी । मालवण : मिडियाच्या माध्यमातून फक्त क्रिकेट स्पर्धाच नाही तर कोकण नाऊ इतर सामाजिक कार्यक्रम राबवित आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. म्हणूनच मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो आहे. अशा शब्दात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी वरेनियम – कोकण नाऊ प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्या. कोकण नाऊ आयोजित या स्पर्धेला आज पासून मालवणच्या बोर्डिंग क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली, या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी निलेश राणे बोलत होते.


यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, कोकण नाऊने आयोजित केलेल्या प्रीमियर लीगला पहिल्यांदाच येण्याचा योग आला. कोकण नाऊचे संचालक विकास गावकर यांचा माझा परिचय गेल्या अनेक वर्षापासूनच आहे. पत्रकारितेमध्ये त्यांनी आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे. हे करत असताना त्यांनी स्वतःचे डिजिटल चॅनेल सुरु केले. त्यात त्यांना यश देखील आले. आज कोकण नाऊची वाटचाल फार चांगल्या प्रकारे चालू आहे. चॅनेल चालवत असताना विकास गावकर सामाजिक बांधिलकी देखील विसरले नाहीत. आज मी अनेक कार्यक्रमांना जातो पण मला असे वाटते कि जेवढे कार्यक्रम राजकारणी घेत नाहीत त्यापेक्षा जास्त कार्यक्रम आता मीडियावाले घ्यायला लागलेत. जिथे राजकारणी कमी पडतात तिथे कोकण नाऊच्या विकास गावकरांसारखी मंडळी पुढे येतात. हि एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा आणि लाखोंची बक्षिसे असे आयोजन कोकण नाऊ चॅनेलने केले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधूनच नाही तर राज्यांमधून देखील येथे खेळाडू खेळात आहेत. हि व्यवस्था उभी करणे हि काही साधीसुधी गोष्ट नाही. त्याच बरोबर मीडियाच्या माध्यमातून फक्त क्रिकेट स्पर्धाच नाही तर कोकण नाऊ इतर सामाजिक कार्यक्रम राबवित आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. म्हणूनच मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो आहे. आजच्या काळात मीडिया चॅनेल चालविणे सोपे नक्कीच नाही. असे असताना आपण हे चॅनेल चालवता. आज या चॅनेलचा चांगला दर्जा आहे. त्याच बरोबर आपण सामाजिक बांधिलकीसुद्धा जपता. अनेक क्षेत्रामध्ये कोकण नाऊचे काम आहे. आपण हे काम असेच नेटाने करत राहावे. आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणिक प्रत्येक उपक्रमामध्ये यशच मिळो हि सदिच्छा. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आपले नेहमी सहकार्यच असते. त्यासाठी मी आपला आभारी आहे. आपल्या कामासाठी आणि सामाजिक बांधिलकीअसाठी शुभेच्छा देतो आणि मी आपल्या नेहमी बरोबर आहे. अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे संचालक तथा उद्योजक विशाल परब, व्हरेनियम क्लाऊडचे चीफ अँड नेटवर्क हेड मुंबई मुकुंदन राघवन, व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव, बँक ऑफ बरोडाचे कुणालकुमार, जि प चे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, पत्रकार परिषदेचे पदाधिकारी नंदकिशोर महाजन, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, सौ. वैशाली गावकर, ओंकार गावकर आदी मान्यवरउपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, मालवण.

error: Content is protected !!