शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने श्री.शैलेश नाईक यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर.

दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक, क्रीडातपस्वी, कर्तव्यदक्ष व आपल्या ज्ञानदानाच्या सेवेला वाहून घेतलेले मुख्याध्यापक,
श्री. शैलेश नाईक सर
हे नुकतेच 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना पुढील सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक भारती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिक्षक भारती सिंधुदुर्ग व माध्यमिक पतपेढी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर सर, सचिव-श्री.समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण, तालुका अध्यक्ष अनिता सडवेलकर, पतपेढी उपाध्यक्ष सुमेधा नाईक, पतपेढी संचालक श्री.प्रदीप सावंत, विध्यासेवक पतपेढी अध्यक्ष श्री. पवन वणवे, चेंदवन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.माणिक पवार, मुख्याध्यापक श्री.राजाराम पवार, कुडाळ पतपेढी संचालक श्री. विद्यानंद पिळणकर, श्री.अरविंद मेस्त्री, श्री. संतोष वैज, श्री. अनिरुद्ध वेतुरेकर, श्री. रोहन पाटील, श्री.रमेश गावडे, श्री. अभिषेक कशेळीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षक बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. शैलेश नाईक सर यांच्या कार्याचा आढावा घेताना श्रीमती. अनिता सडवेलकर म्हणाल्या की, “सरांनी आपल्या कार्यकाळात ज्ञानदानाच्या सेवेला पूर्ण वाहून घेतले होते. सरांकडून आयुष्यात आम्हीं खूप चांगले गुण शिकलो, आज मी शिक्षिका म्हणून जी सेवा करतेय त्यात सरांचा वाटा खूप मोठा आहे. दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे गुण नाईक सरांकडूनच शिकावेत. सरांनी आपल्या कार्यकाळात कितीतरी गुणवान खेळाडू घडविले, सरांच्या मार्गदर्शनामुळेच जवळपास १०७ खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. सरांचे मार्गदर्शन यापुढेही आम्हांला लाभत राहावे तसेच सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखी समाधानी जावे.” अशा स्नेहपूर्वक व प्रेमळ शुभेच्छा अनिता सडवेलकर मॅडम यांनी दिल्या. शिक्षक भारती अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर सर यांनी सरांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
शिक्षक मित्रांनी सरांच्या जीवनातील हृदय आठवणी कथन केल्या व सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून सांगितले.सरांची स्वयंशिस्त आणि विद्यार्थी प्रियता याबाबत आठवणींना उजाळा दिला.
त्यानंतर श्री. शैलेश नाईक सर व सौ. लिविषा शैलेश नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री. वेतुरेकर सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. शैलेश नाईक सर यांनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक भारतीच्या प्रती निष्ठा म्हणून संघटना निधी साठी 5000/- चा धनादेश शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष आदरणीय श्री. वेतुरेकर सर यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या प्रति भावना व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री. शैलेश नाईक सर म्हणाले, “शिक्षक भारती, सिंधुदुर्गचं काम अतिशय योग्य व चांगल्या प्रकारे चाललं असून, जिल्ह्यामध्ये फक्त एकमेव शिक्षक भारती संघटना सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या पाठीशी उभी राहून लढत आहे, व वेतुरेकर सर जे काम करतात त्याला मी सलाम करतो, सरांच्या पाठीमागे असेच सर्वांनी भक्कम उभे राहा. मला अभिमान आहे की मी शिक्षक भारतीचा शिलेदार आहे. जरी आज मी सेवा निवृत्त झालो असलो तरी आपण जेव्हा जेव्हा मला हाक द्याल तेव्हा तेव्हा मी तुमच्या बरोबर असेन…”
यावेळी या छोटेखानी सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनिता सडवेलकर यांनी केले.

error: Content is protected !!