…अन्यथा राज्यात 14 डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन

राज्य सरकारी, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर, नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग च्यावतीने धडक मोर्चा
कर्मचाऱ्यांना मिळणारी जुनी पेन्शन व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या इतर मागण्यांसाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये मोर्चामध्ये महसूल भूमी अभिलेख जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व संघटना पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सहकुटुंब मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या चे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत सादर करण्यात आलेले आहे. तसेच या मोर्चाची दखल घेऊन शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण राज्यातील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार आहेत.
आज दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजीचे आंदोलनामध्ये 7 वर्षीय श्री.विनायक माळवे यांनी देखील पेन्शनच्या मागणी करिता आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला असून त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरलेली आहे.
यावेळी उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी आणि कर्मचारी अधिकारी यांनी जे सरकार आपणास पेन्शन देईल त्याच सरकारला आम्ही आमचे कुटुंबीय आमचा मित्र परिवार आमचे नातेवाईक आजन्म मतदान करतील अशी शपथ देखील घेतलेली आहे. तसेच दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून होणारे बेमुदत आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे.
यापुढील आरपारची लढाई आहे.
आता नाही तर कधीच नाही.
माझे भविष्य माझी लढाई. असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, यांनी केलेले आहे.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, सचिन माने सहसचिव आदी प्रवर्ग निहाय संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी