अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणी प्रणाली माने, मिलींद माने यांना अटकपूर्व जामीन

संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलाला रस्त्यामध्ये अडवून मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड येथील मिलिंद माने व त्यांची पत्नी नगरसेविका प्रणाली माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला.
ही घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वा. सुमारास तुळशीनगर येथील वेदांत बीअर शॉपीजवळ घडली होती.
याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार देवगड कनिष्ठ महाविद्यालयात सायन्स शाखेत शिकत असलेला एका अल्पवयीन मुलाला 11 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर तुळशीनगर येथील परशुराम अपार्टमेंट जवळ असलेल्या वेदांत बिअर शॉपी नजीक मित्रांसमवेत गप्पा मारत उभा असताना मिलिंद माने यांनी फोनवर शिवीगाळ करून तू कुठे आहेस ते सांग असे बोलून अचानक गाडी क्रमांक एम एच 07 1212 ही हुंडाई आय 10 गाडी घेऊन येत त्या अल्पवयीन मुलाला गप्पा मारत असताना त्याला आडवा करून त्याच्या कानशिलात मारले व गडग्यावर आपटले. यावेळी त्या मुलाच्या मित्रांना देखील मिलिंद माने यांनी दम दिला व मिलिंद माने यांनी बेसबॉल बॅट चा वापर करून त्या अल्पवयीन मुलाच्या खांद्यावर मारली. त्यावेळी सोबत असलेली मिलिंद माने यांची पत्नी नगरसेविका प्रणाली माने यांनी या मरहाणीचे व्हिडिओ शूटिंग करत याला चांगला चोप द्या असे सांगून दोघांनी त्याला मारून टाकू अशी धमकी दिली. व गाडी घेऊन पळून गेले. हा प्रकार त्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रकार त्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले व देवगड पोलीस ठाण्यात मुलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. या फिर्यादी नंतर पोलिसांनी नगरसेविका प्रणाली माने व मिलिंद माने यांच्याविरुद्ध भादवि कलम ३२४, ३२३, ३४१, ५०४, ५०६, ५०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी देवगड न्यायालयात दोन्ही संशयीत स्वता हुन काल 7 नोव्हेंबर रोजी ऍड. उमेश सावंत यांच्या सोबत हजर झाले व जामीनासाठी न्यायालयाकडे विनंती केली. त्यावेळी प्रत्येकी 15 हजाराच्या जाचमुचलक्यावर देवगड न्या. श्रीमती एन बी घाटगे यांनी मुक्तता केली. संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली