निरवडे येथे शेतकऱ्यांना योजनांचे धडे मेळाव्यास प्रतिसाद

मुळदे उद्यानविद्या महाविलयाचा उपक्रम
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांचा ग्रामीण कार्यानुभव उपक्रम 2023 या माध्यमातून दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी निरवडे ग्रामपंचायत ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे शेतकरी मेळावा पार पडला.
शेतकरी मेळावा हा उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता .डॉ.राजन खांडेकर यांचा मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता.सदर शेतकरी मेळाव्यास उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे तज्ञ मार्गदर्शक डॉ.रणजित देव्हारे सर, डॉ.निलिमा पवार मॅडम आणि डॉ.गिरीश उईक सर यांचे फळबाग,भाजीपाला लागवड,सेंद्रिय शेती,कीटक नाशक औषधे आणि सरकारी योजना या विषयावर शेतकरी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन राहिले.तसेच या शेतकरी मेळाव्यामध्ये अनेक शेतकरी वर्गाच्या प्रश्नांचे योग्य मार्गदर्शन करून निरसन करण्यात आले.तसेच मुख्य पिकांबरोबर आंतर पिके कोणती घेतली पाहिजे आणि शेतकरी वर्गाला जास्त उत्पन्न कसे मिळेल या वर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. सदर शेतकरी मेळाव्यास पन्नासहून अधिक प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कु.राजस कदम याने केले.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे कु.राजस कदम, कु.सुयश काळे, कु. सुदर्शन पाथलावथ,कु.रामचंद्र वारंग, कु.अमन नवल आणि कु.ओमकार उंबरकर या विद्यार्थ्यांनी शेतकरी मेळावा पार पाडण्यास मेहनत घेतली. निरवडे गावच्या सरपंच सौ.सुहानी गावडे आणि उप-सरपंच श्री.अर्जुन पेडणेकर आणि सर्व ग्रामस्थ-शेतकरी यांनी शेतकरी मेळावा या उपक्रमाचे खूप कौतुक केले.
सावंतवाडी प्रतिनिधि