खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंजुर असलेल्या भिरवंडे मध्ये बीएसएनएल टॉवर चे काम सुरू

शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून भिरवंडे गावात गावासाठी बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला. या टॉवर चे भूमिपूजन शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भिरवंडे गावातील उपसरपंच नितीन सावंत शिवसेना तालुकाप्रमुख डॉ प्रथमेश सावंत ,युवासेना तालुकाप्रमुख श्री उत्तम लोके, तालुकाप्रमुख श्री हेमंत सावंत, विभागप्रमुख मंगेश सावंत, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, ग्रामपंचायत सदस्य सावंत, संतोष सावंत, प्रकाश गावकर, मनीष सावंत, सचिन सावंत, मिलिंद सावंत, संतोष बळीराम सावंत, पुरुषोत्तम सावंत, दिगंबर सावंत, उमेश सावंत, कमलेश नारकर, प्रकाश सावंत, अनो सावंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. भिरवंडे गावातील ग्रामस्थांकडून बीएसएनएल टॉवर मंजूर केल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे आभार मानण्यात आले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!