कलमठ मधील श्रीकृष्ण व नरकासुर स्पर्धेत लांजेवाडी प्रथम, भालचंद्र द्वितीय, तर पिंपळपार सुतारवाडी तृतीय

कलमठ येथे श्रीकृष्ण, नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या वतीने आयोजन
दिवाळी निमित्त दरवर्षी कलमठ बाजारपेठ येथे संदिप मेस्त्री मित्रमंडळच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गड किल्ले स्पर्धा , अंगण रांगोळी स्पर्धा, डबलबारी अश्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कलमठ गाव मर्यादित असलेल्या या स्पर्धेसाठी १० मंडळानी सहभाग घेतला. स्पर्धेला प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती.
यामध्ये कलमठ लांजेवाडी मित्रमंडळ प्रथम, भालचंद्र कुंभारवाडी द्वितीय, तर पिंपळपार सुतारवाडी तृतीय क्रमांक पटकवला चौथा व पाचवा क्रमांक अनुक्रमे कलमठ इसवटी कोष्टीवाडी, बिडीयेवाडी मंडळानी मिळवला. सहभागी सर्वं मंडळाना गौरवण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, अण्णा खाडये, सुनील नाडकर्णी, उपसरपंच पपू यादव, स्वप्नील चिंदरकर,संतोष पुजारे,दिनेश गोठणकर अनुप वारंग, नितीन पवार, गिरीष धुमाळे, अनील मेस्त्री, तनोज कळसुलकर, मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे समीर कवठणकर, आबा कोरगावकर, स्वरूप कोरगावकर, परेश कांबळी, प्रणय शिर्के,बाबू नारकर, सचिन पेडणेकर,संतोष रेवंडकर, दिनार लाड, प्रथमेश धुमाळे, सचिन वाघेश्री, विराज मेस्त्री,प्रविण सावंत, कृष्णा कांबळी महेश मेस्त्री उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी या कार्यक्रमाला मान्यवरानी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या,
बोलताना अण्णा खाडये म्हणाले संदिप मेस्त्री मित्रमंडळचे कार्य जिल्ह्यातील तरुण मंडळाना प्रेरणादायी असून, आपण राबवत असलेले उपक्रम जिल्ह्यातील अनेक मंडळ राबवत असतात दर्जेदार स्पर्धेला उपस्थित राहता आले याचा आनंद असून अश्या उपक्रमशील कामा मुळेच कलमठ गाव नेहमी संदिप मेस्त्री यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी पंचायत समिती सदस्य खाडये म्हणाले.
आभार मानताना संदिप मेस्त्री म्हणाले इतर शहराच्या ठिकाणी होणारे मोठे उपक्रम माझ्या कलमठ गावातील लोकांना देखील आपल्या गावात पाहायला मिळावे याच हेतूने आपण अश्या प्रकारच्या उपक्रमांचे कलमठ गावात करत असतो संदीप मेस्त्री मित्रमंडळ गेली २० वर्षे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यावर्षी गावातील सर्वाना सोबत घेऊन कलमठ महोत्सव देखील आपण करणार असल्याचे सांगितले.





