पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा मालवण दौरा आणि किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकाम हटविणे यांचा काहीही सबंध नाही…..

राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्या चे काम…..

किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविणे संदर्भात सबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजविल्या आहेत(दिनांक ०३/१०/२०२३).सदरच्या नोटीस ही लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या एका नागरिकाच्या तक्रारी च्या अनुषंगाने बजाविण्यात आल्या आहेत.सदरच्या नागरिकाने पर्यटन व्यावसायिक यांच्या अनधिकृत बांधकाम मुळे आपल्या व्यवसायावर तसेच वहिवाट याच्यावर बाधा येत आहे तसेच सदरच्या अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्या अनुषंगाने प्रशासनाने सबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत.यामधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालवण भेट याचा दुरान्वये सबंध नाही.काही राजकीय हेतूने प्रेरित माणसे व्यापारी,पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार या मध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडविन्याचे काम करीत आहेत.”असे प्रतिपादन भाजपा मासेमारी सेल चे. विकी तोरसकर. यांनी एका. निवेदनाद्वारे. केलं आहे

तोरसकर यांनी म्हटले आहे की ” सदर विषयातील तक्रारदार नागरिक हा मविआ आघाडीचा पदाधिकारी आहे.
आदरणीय पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा नौदल दिना निमित्त होणारा मालवण दौरा ऐतीहासिक असून मालवण तसेच सिंधुदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट मध्ये होणाऱ्या पुतळा यामुळे पर्यटनाचे नवीन ठिकाण निर्माण होत आहे.त्याचा फायदा स्थानिक व्यापारी,पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यानाच होणार आहे.त्यामुळे मच्छीमार व पर्यटन व्यवसायिक यांनी टोकाची भूमिका घेऊ नये तसेच कुठच्याही अफवेला बळी पडू नये” असे आवाहन सदरच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करीत आहे. “त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन सोबत संबंधित विषयात चर्चा चालू आहे.लवकरच मा.तहसीलदार तसेच मा.जिल्हाधिकारी यांची मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिक सोबत बैठक आयोजित करण्या साठी प्रयत्न चालू आहेत.तरी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांनी आंदोलनात्मक पवित्रा न घेता प्रशासनाशी संवाद साधावा व त्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत.” असेही रविकिरण चिंतामणी तोरसकर जिल्हा संयोजक,मच्छीमार सेल, भाजपा, सिंधुदुर्ग यांनी निवेदनात म्हटले आहे.

मालवण (प्रतिनिधी)

error: Content is protected !!