भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचला प्रमाणपत्र वितरित
फोटोग्राफी सेमिनारला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी । कुडाळ : येथील भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि उत्कृष्ट फोटोग्राफर डॉ. रुपेश धुरी यांचे फोटोग्राफीतील करियर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान सुद्धा झाले.
कुडाळ येथील श्रीराम उर्फ भूषण जडये संचालित भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीची नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरुवात झाली. पहिल्या बॅच साठी सहाजणांनी प्रवेश घेतला होता. तीन महिन्याचा हा बेसिक कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थाना संस्थेतर्फे प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. फोटोग्राफी स्कुलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. रुपेश धुरी, संचालक भूषण जडये, सौ. आर्य जडये उपस्थित होते. अवधूत राणे, सोहम घाटे, ऍड. सुहास सावंत, निलेश जोशी, सौ. शिल्पा नायबागकर आणि अमेय जोशी यांना भूषण जडये यांनी प्रमाणपत्र प्रदान केले. त्याच बरोबर अवधूत राणे, सौ. शिल्पा रायबागकर आणि निलेश जोशी यांचा त्याही कोर्स कालावधीत काढलेल्या उत्कृष्ट फोटोची प्रिंट देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख अतिथी डॉ. रुपेश धुरी यांनी फोटोग्राफीतील करियरच्या संधी आणि फोटोग्राफी म्हणजे नेमके काय यावर मार्गदर्शन केले. भरपूर फोटो काढा, फोटोग्राफीतील बारकावे शिका आणि फोटोग्राफीचा आनंद घ्यायला शिका असा सल्ला त्यांनी उपस्थित फोटोग्राफीप्रेमींना दिला. यावेळी भूषण जडये यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कालसाक्षर व्हा असे आवाहन केले. प्रमाणपत्र वितरण समारंभाला आणि फोटोग्राफी सेमिनारला अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राची स्कुलची दुसरी बॅच लवकरच सुरु होणार असून त्यासाठी ७८८७६८२१४६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.