माई ह्युंदाईच्या रौप्यमहोत्सवी वर्षात आणखी एक मानाचा तुरा

महाराष्ट्र : सीडनी (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या ह्युंदाई डीलर्स मीट मध्ये माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांचा ह्युंदाई मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अनसू किम आणि सीओओ तरुण गर्ग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माई ह्युंदाईच्या रौप्यमहोत्सवी वर्षात आणखी एक मानाचा तुरा माई ह्युंदाईच्या शिरपेचात खोवण्यात आला.

माई ह्युंदाईची स्थापना 1998 साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. घाटगे ग्रुपचा वाहतूक व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव, ग्राहकाभिमुख सेवा व त्यांचं देशभर असलेला विस्तार लक्षात घेऊन ह्युंदाई मोटर्सने घाटगे ग्रुपला ह्युंदाई कार्सची डीलरशिप दिली. कोल्हापुरातील माई ह्युंदाईची कामगिरी लक्षात घेऊन नंतर सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी माई ह्युंदाईला अधिकृत विक्रेते म्हणून ह्युंदाई मोटर्सने कार विक्रीसाठी नेमणूक केली. गेल्या 25 वर्षात सर्वोत्तम ग्राहक सेवेच्या पाठबळावर माई ह्युंदाईने विभागीय तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
सत्काराला उत्तर देतांना तेज घाटगे यांनी माई ह्युंदाईच्या 70 हजाराहून अधिक ग्राहकांचे विशेष आभार मानले आहेत. माई ह्युंदाईच्या विस्तारात ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे. ग्राहकांकडून वेळोवेळी मिळणारा फीडबॅक आमच्या कामात सुधारणा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि यातून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माई ह्युंदाईचे सर्व अधिकारी, कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात. याचाच परिणाम म्हणजे माई ह्युंदाईचा सतत वाढणारा समाधानी ग्राहक वर्ग. रोजच्या व्यवसायाशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात माई ह्युंदाईचा सहभाग असतो. पाण्याची बचत, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, कोरोना काळातील कोविड केअर सेंटर ही काही उदाहरणे यानिमित्ताने देता येतील. या सर्वांच्या माध्यमातून समाजात मिसळता येते आणि व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपता येते असं प्रतिपादन तेज घाटगे यांनी केलं. माई ह्युंदाईचं सध्या रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. आणि या वर्षातील हा सत्कार म्हणजे माई ह्युंदाईच्या कार्यक्षमतेचा सत्कार आहे. यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे. सहकाऱ्यांच्या सहकार्याने माई ह्युंदाई यापुढील काळातही सर्वोत्तम सेवेसाठी बांधील राहील अशी ग्वाही तेज घाटगे यांनी दिली.

या सत्कारावेळी तेज घाटगे यांच्या समवेत माई ह्युंदाईचे डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, जनरल मॅनेजर विशाल वडेर, सतीश पाटील उपस्थित होते…

प्रतिनिधी / कोकण नाऊ / महाराष्ट्र

error: Content is protected !!