पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थपोईप यांच्यावतीने 28ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 20* 20डबलबारी भजनाचे आयोजन

पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे यानिमित्त कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पोईप गावातील ग्रामस्थांची सुस्वर भजने ,रात्रौ 8.30 वाजता 2020 डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे .श्री पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट बुवा हेमंत नारायण तेली गुरुवर्य कै. बुवा मनोहर सावंत, भजन सम्राट बुवा श्री रामदास कासले ,संगीत अलंकार गुरुवर्य श्री अजित बुवा गोसावी यांचे शिष्य, पखवाज म्हणून दयानंद नारायण तेली, तबला आदित्य मेस्त्री, स्वप्निल तेली, यांच्या विरुद्ध श्री विठ्ठल रुक्माई प्रसादी भजन मंडळ बोरिवली देवीपाडा बुवा श्री विशाल गोविंद मसुरकर गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य यांना पखवाज म्हणून तुषार परब, चकवा योगेश परब यांच्या त 2020 डबलबारी भजनाचा सामना होणार आहे तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांनी केले आहे

संतोष हिवाळेकर, पोईप

error: Content is protected !!