जादूटोणा विरोधी कायदा व्याख्यान संपन्न

महाराष्ट् शासनाने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ ला संमत केला या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी सर्व जिल्हयामध्ये मा . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम समिती -PIMC स्थापन केली : या समितीच्या आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा 2013 व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीसाठी प्रात्यक्षिकासह कार्यशाळेचे आयोजन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी केले होते . यामध्ये सरस्वती विद्यामंदिर गावराईच्या मुख्याध्यापिका श्रीमती बांदेकर मॅडम यांनी आपल्या शाळेमध्ये या व्याख्यानाचे आयोजन केले . पाताडेवाडे उत्कर्ष मंडळाचे श्री अजिंक्य पाताडे व कृष्णा पाताडे यांनी पाताळेवाडी सुकळवाड येथे आयोजन केले .. ‘श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . पी . एच . कुबल सर यांनी आपल्या वडाचापाट हायस्कूल मध्ये आयोजन केले . सौ . इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईपचे मुख्याध्यापक श्री कुंभार सर यांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये व्याख्यान आयोजित केले . जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खोटले नं . १ येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ आंगणे मॅडम यांनी आपल्या प्रशालेमध्ये तर सौ सुहासिनी श्रीधर परब हायस्कूल खोटले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . मळगावकर सर यांनी आपल्या प्रशाळेमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते ..या व्याख्याना मध्ये श्री . विजय चौकेकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरुद्ध कायदा या विषयावर व्याख्यान देताना समाजातील विविध अंधश्रद्धा याविषयी संतांनी केलेले अभंगातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व महामानवाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचे व त्यांनी लिहिलेल्या अभंग मांडलेले विचार सांगितले . यामध्ये भगत देवी बुवा बाबा बाया मांत्रिक हातचलाखीने अथवा रासायनिक संयोगाने जे चमत्कार करतात असे विविध चमत्कार विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना करून दाखवले व त्यांच्याकडून करून घेतले .यामध्ये पाण्याने दिवा पेटविणे . रिकाम्या हातातून सोन्याची चैन विभूती काढून दाखविणे . पेटता कापूर खाणे .मंत्राने अग्नी पेटविणे . नारळ अधांतरी उभा करणे . मंत्राने पेट त्या अगरबत्ती ची दिशा बदलविणे . जिभेतून तार काढून दाखवणे . नारळ लिंबातून करणी उतरविणे . मंत्राने विभूतीचा रंग लाल करणे .अखंड केळ्याची कापे करणे . आधी प्रयोग प्रात्यक्षिके व हातचलाखीचे चमत्कार करून दाखविले आणि त्याची सविस्तर माहिती सांगून त्यामागील हातचलाखी व रासायनिक संयुगाची नावे सांगून त्यांच्या मनातील भीती घालविली . समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणला तरच समाज सुखी संपन्न आणि समृद्ध होईल असेही सांगून समाजात अशा लुबाडणाऱ्या देवी भगत मंत्री मांत्रीक बुवा बाबा यापासून सावध राहावे अशा घटना आजूबाजूला घडत असल्यास त्याची कल्पना दक्षता अधिकारी तसेच समितीला द्यावी असे आवाहन केले यावेळी त्या त्या परिसरातील पालक प्रशालेचे सर्व शिक्षक तसेच संजय खोटलेकर उपस्थित होते . .

error: Content is protected !!