पटकी देवीच्या महाआरतीला तुडुंब गर्दी

पटकी देवी मित्र मंडळा च्या वतीने करण्यात आले होते आयोजन

कणकवली पटकी देवी मित्र मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरती ला तुडुंब गर्दी झाली होती. कणकवली पटकी देवी येथे आज नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी देखील अशाच प्रकारे महाआरती करण्यात आली होती. या महाआरतीच्या माध्यमातून देवीला साकडे घालण्यात येत असून, सर्वांना निरोगी ठेव व साथीच्या रोगा पासून सर्वांचे रक्षण कर असे साकडे या निमित्ताने देवीला घालण्यात आले. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संजय कामतेकर, पंकज पेडणेकर, भाई साटम, राजू गवाणकर, बंडू गांगण, किशोर राणे, अभिजीत मुसळे, संदीप नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला या महाआरतीला उपस्थित होत्या.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!