सिंधुदुर्ग किल्ल्यावर माझा देश माझी माती उपक्रम

सिंधुदुर्ग युवा मोर्चाचे आयोजन
तालुक्यातील माती कलश जिल्हाध्यक्ष कडे सुपूर्द
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातीला अभिवादन, वीरांना नमन म्हणून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान देशभर हाती घेतले असून भारतीय जनता युवा मोर्चा देखील देशभर सेल्फी विथ मिट्टी अभियान देशभर राबवत आहे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सेल्फी विथ मिट्टी उपक्रमात विश्वविक्रमी नोंद करणार असल्याचे सिंधुदुर्ग युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी सांगितले, दूरदृष्टी असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी जवान व माती यांच्या प्रती आदर व वीरांच्या समर्पण भावनेला सलाम म्हणून आपण देखील वीरांच्या प्रती आदराची भावना कायम राखावी म्हणून हे अभियान देशभर राबवत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्यभर विक्रमी सेल्फी विथ मिट्टी अभियान भारतीय जनता युवा मोर्चा राबवत असून प्रत्येक जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून माती कलश तालुकाध्यक्ष मार्फत जिल्हाध्यक्ष स्वीकारत असून सदर कलश राज्य पातळी वरून देशपातळीवर नेले जाणार आहे
आज सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर मेरी मिट्टी मेरा देश उप्रकम राबवण्यात आला जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आज माती कलश सिंधुदुर्ग किल्यावर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, सरचिटणीस संतोष पुजारे, मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, प्रसाद पाटकर,सुशांत घाडीगावकर,ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, प्रणव वायंगणकर,सोशल मीडियाचे समीर प्रभुगावकर,गौरव घाडीगावकर, सर्वेश दळवी,नारायण कुंभार, संदिप बांदेकर,जयेश चींचोळकर, सुमित सावंत,मंदार पडवळ,राकेश सावंत,गौरव लुडबे, निषय पालेकर,संजय नाईक, राकेश सावंत,सिद्धेश कांबळी, साई सावंत, बाबू राणे,शुभम लुडबे, सुशील गावडे,सुरज भगत,राज कांदळकर,निनाद बादेकर,राहुल हरचकर,पराग परब,रोहित जोशी आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी