भाजपच्या वतीने नऊ महिलांचा होणार ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूमधाम सुरू असून विविध स्वरूपातील देवीचे पूजन सार्वजनिक स्तरावर केले जात आहे. भारतीय आणि हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीचे स्थान अनन्यसाधारण असून आजच्या वर्तमान युगात स्त्री ही पुरुषापेक्षा कोठेही कमी नाही. सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा वावर अगदी सुव्यवस्थित सुरू असून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आपले काम कौशल्याने करत आहेत.
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान भाजपा च्या वतीने वेंगुर्ला येथे भाजपा तालुका कार्यालयामध्ये मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या सर्व महिलांनी आपल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले असून अशा नऊ महिलांचा सन्मान ” रणरागिणी पुरस्कार ” देऊन केला जाणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महीला मोर्चाच्या स्मिता दामले यांनी केले आहे.
सावंतवाडी, प्रतिनिधि