वायंगणी मठात ललीत पंचमी उत्सव संपन्न

दर्शनासाठी भाविकांची रीघ
आचरा- वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात ललीत पंचमी निमित्त स्वामींच्या आदीमाया रुपातील दर्शन सोहळ्यास भाविकांनी गुरुवारी गर्दी केली होती. या निमित्त मंदिरात श्री स्वामी समर्थ सैवा मंडळातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे पाच पासूनच मंगल स्नान,नित्य आरती,कुंकुम अभिषेक, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तर दुपार नंतर सुस्वर भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष सदा राणे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले
आचरा–अर्जुन बापर्डेकर





