उबाठा शिवसेना खासदारांनी ९ वर्षात चिंचवली गावाला काय दिले?

होऊ द्या चर्चा ‘ या ऊबाठा शिवसेनेच्या पत्रकाना भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांचे सडेतोड प्रतिउत्तर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा ‘ या आशयाच्या पत्रक वाटपाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राजकीय वातावरणाने ढवळून निघाला असून उभाठा शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठेत होऊ द्या चर्चा या आशयाची पत्रके नुकतीच वाटप करण्यात आली होती. याला प्रतिक्रिया देताना खारेपाटण विभाग भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी देखील ‘होऊ द्या चर्चा’ विकास कामांच्या आशयाचे बॅनर लावून प्रतिउत्तर दिले.
भाजप शक्तीकेंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर यांनी होऊ द्या चर्चा या आशयावर लावलेले बॅनर देखील सदस्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.दरम्यान ४ दिवसापूर्वीच खारेपाटण बाजारपेठेत उबाठा शिवसेनेच्या वतीने जन की बात छेडत केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या पर्दाफाश करणाऱ्या स्थानिक भाजप आमदार नितेश राणे यांना पत्रकाद्वारे १० प्रश्न विचारणारी पत्रके वाटप केली होती.
याच आशयाचा धागा पकडून भाजप शक्ती केंद्र प्रमुख यांनी खारेपाटण विभागात तसेच चिंचवली या गावात ‘होऊ द्या चर्चा ‘ – या आशयाचे मोठे बॅनर लावून ९ वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदाराणे विकासकामांसाठी काय दिले ? तर स्थानिक भाजप आमदार नितेश राणे चिंचवली गावाला काय दिले? होऊ दे चर्चा — गावासाठी दिलेल्या निधीवर आदी आशयाचे बॅनर सद्या सर्वत्र झळकत आहेत व सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या बॅनर द्वारे आमदार नितेश राणे यांनी मागील ९ वर्षात चिंचवली गावासाठी एकूण १३ विविध विकास कामासाठी सुमारे ६८ लाख पेक्षा अधिक विकास निधी या गवसाठी दिला असून मागील ९ वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदारांनी देखील चिंचवली गावासाठी आजपर्यंत किती निधी दिला.? असा सवाल उपस्थित करीत यावर सुधा ‘होऊ द्या चर्चा ‘…. अशी प्रतिक्रिया भाजप खारेपाटण विभाग शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी दिली.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!