” भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये- तेजस राऊत

” होऊ द्या चर्चा ” या उबाठा शिवसेनेच्या खारेपाटण येथील पत्रक वाटप कार्यक्रमाच्या विरोधात भाजप कार्यकर्ते सूर्यकांत भालेकर यांनी बॅनर प्रसिद्ध करून खासदार विनायक राऊत यांचेवर विकास कामांच्या मुद्द्यावर टीका केली होती. यावर तिखट प्रतिक्रिया देताना शिवसेना युवा सेना कणकवली उपतालुका प्रमुख श्री तेजस राऊत यांनी ” गाव मर्यादित शक्तिकेंद्र प्रमुख भालेकर यांनी सुर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करू नये.अशी बोचरी टीका केली.
खासदार श्री.विनायक राऊत साहेब यांच्या माध्यमातून १ कोटी ५६ लाख येवढा निधी आजपर्यंत खारेपाटण साठी मिळाला आहे . त्यामध्ये खारेपाटण हायवे रस्ता ते बस स्टॅंन्ड१० लाख , शेठ न . म विद्यालय रस्ता ४ लाख , कोष्टेवाडी रस्ता ५ लाख , कर्लेवाडी पर्यायी रस्ता ५० लाख , बंदर वाडी रस्ता उंची वाढवणे ( घोडे पाथर ) ६०लाख , चव्हाटा रस्ता ५ लाख , दुर्गादेवी मंदिर रस्ता ५ लाख,बस स्टॅंन्ड स्वच्छता गृह , शेड ,कंपाउंड ऑल१७ लाख.जनतेचे कार्यसम्राट खासदार सन्मानिय श्री .विनायक राऊतसाहेब यांच्यावरील टिका हि उद्विघ्न भावनेतून केली गेली असल्याचे देखील श्री तेजस राऊत यांनी सांगितले.
खारेपाटणसाठी स्वतःच्या नेत्यांकडुन सत्ता असून सुद्धा भाजपाशक्ती केंद्र हे प्रमुख विकास निधी आणण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे स्वतःच अपयश झाकण्यासाठी आणी स्वतःला प्रकाश झोतात ठेवण्यासाठी केलेला हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे . यापुढे आमच्या नेत्यां वरती नाहक टिका केल्यास जस्यास तसे उत्तर देण्यात येईल. असा इशारा देखील युवा सेना कणकवली उपतालुका प्रमुख तेजस राऊत यांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!