संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये पारंपारिक वाद्यांशी पुन्हा एकदा जोडली विद्यार्थ्यांची नाळ

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती व वैज्ञानिक A.p.j. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत वाचन प्रेरणा दिन एका अनोख्या रूपात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी म्हणून वाचन प्रेरणा साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून प्रशालेत वाचाल तर वाचाल हा एक छोटेखानी उपक्रम राबविण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पारंपारिक वाद्यांची माहिती व ती वाजवण्याची आवड व कला अवगत व्हावी यासाठी म्हणून एक संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत पखवाज या संगीत वाद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी व पखवाज विषयी माहिती मिळावी. यासाठी म्हणून पखवाज विशारद श्री सुरज परब, वेंगुर्ले यांचे मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यशाळेस प्रशालेतील इयत्ता पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. पखवाज विषयी शास्त्रीय माहिती या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच काही तालांचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आवडीने या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग दर्शविला व भविष्यात आपणही पखवाज विशारद व्हावे ही इच्छा व्यक्त केली.
या कार्यशाळेचे आयोजन प्रशालेचे संस्थाध्यक्ष आदरणीय श्री नरपत जैन सर,श्री शेखर जैन सर यांनी आयोजन केले होते तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर , कमिटी सदस्य श्रीमती श्रावणी प्रभू मॅडम यांनीही या कार्यशाळेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांपर्यंत वाद्य संस्कृतीची माहिती व त्यांची जोपासना कशी करावी याचे ज्ञान देण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हेमंत आणि सर यांनी पखवाज विशारद श्री सुरज परब यांचे या कार्यशाळेत उपस्थित राहिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त केले.
सावंतवाडी, प्रतिनिधि