कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धेमध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक मुलांचा दुसरा क्रमांक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षण समिती संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धा जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या भव्य मैदानावर पार पडल्या. सदर स्पर्धेत सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका व सांगली महानगरपालिका अशा एकूण २० संघानी भाग घेतला होता.
स्पर्धा १९ वर्ष मुले-मुली व १७ वर्ष मुले- मुली अशा चार गटात खेळविल्या होत्या. सदर स्पर्धेत १७ वर्ष मुले – मुलींच्या जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या संघांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. स्पर्धेत मुलींच्या संघाने चौथा क्रमांक पटकाविला तर मुलांचा अंतिम सामना सांगली विरूद्ध सिंधुदुर्ग (त्रिंबक) फार रंगतदार झाला, सदर सामन्याला हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. रंगतदार झालेल्या या सामान्यत सिंधुदुर्ग संघ २ -१. अशा फरकाने पराभुत झाला व विभागीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला.
विजयी संघांचे श्री सुरेंद्र सकपाळ सकपाळ अध्यक्ष- माध्यमिक शिक्षण समिती, त्रिंबक, श्री. अशोक बागवे उपाधक्ष श्री. अरुण घाडी, कार्यवाह– व. सर्व संचालक तसेच श्री. प्रवीण घाडीगांवकर ,मुख्याध्यापक जनता विद्या मंदिर त्रिंबक, श्री .महेंद्र वारंग, क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.
आचरा, अर्जुन बापर्डेकर





