कणकवली तालुका भाजपतर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन

१५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कार्यक्रमात सहभागी होण्याचे तालुका भाजपतर्फे आवाहन
कणकवली तालुका भाजपतर्फे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोरील जागेत १५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रविवार १५ रोजी सकाळी ९ वा. देवीची श्री पटकीदेवी ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत मिरवणूक सकाळी १० वा. देवीची प्रतिष्ठापना व महाआरती, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. श्री देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘देव झाला अजपाल हा प्रयोग सादर होईल.. सोमवार १६ रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, दांडेली-सावंतवाडी यांचा ‘कालचक्र’ हा प्रयोग सादर होईल. मंगळवार १७ रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, १२.३० वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी -कुडाळचे बुवा अरुण घाडी व श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाडण – देवगडचे बुवा संदीप पुजारे यांच्या डबलबारी भजनाचा सामना होईल. बुधवार १८ रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. वालवलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, वालवल- कुडाळ यांचा मनसादेवी महिमा हा प्रयोग सादर होईल. गुरुवार १९ रोजी सकाळी ८ वा. कुंकूमार्जन पूजा, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. श्री देवी दक्षिणी दशावतार नाट्यमंडळ, माणगाव यांचा ‘मित्रप्रेम’ हा प्रयोग सादर होईल. शुक्रवार २० रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. महिलांचा फुगडी व होममिनिस्टर कार्यक्रम शनिवार २१ रोजी सकाळी ८ वा. कुंकूमार्जन पूजा, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स स्पर्धा रविवार २२ रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. संगीत भजने, सायंकाळी ४ वा. गणेश मवानी दशावतार नाट्यमंडळ हुंबरट कणकवली यांचा दैवरेषा हा प्रयोग सादर होईल. रात्री ८ वा. श्री. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी -कुडाळ यांचा ‘लक्ष्मीव्रत महिमा’ हा प्रयोग सादर होईल. सोमवार २३ रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा देव लज्जागौरी महिमा हा प्रयोग सादर होईल. मंगळवार २४ रोजी सकाळी ८ वा. कुंकुमार्जन पूजा, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. संगीत भजने, रात्री ८ वा. ओम चैतन्य गगनगिरी प्रासादिक भजन मंडळ, उंबर्डे – वैभववाडीचे बुवा श्रीकांत शिरसाट व ओम श्री स्वामी समर्थ नवतरुण प्रासादिक भजन मंडळ लोरे नंबर १ चे बुवा रिया मेस्त्री यांच्या डबलबारी भजनाचा सामना होईल. बुधवार २५ रोजी सायंकाळी ४ वा. शहरातून देवीची विसर्जन मिरवणूक निघणार असून गणपती साना येथे देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. तरी भाविकांनी या उत्सवास सहभागी व्हावे, कणकवली तालुका भाजपतर्फे करण्यात आले आहे.
कणकवली, प्रतिनिधी