उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित , कृषिभूषण या पुरस्कारांनी सन्मानित शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक असलेले वेतोरे येथील श्री. संतोष गाडगीळ यांनी आज शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करून संतोष गाडगीळ यांचे स्वागत करण्यात आले.
“आदरणीय शारदचंद पवार शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला, 100% फलोत्पादन योजना राबविल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी स्वतः च्या पायावर उभे राहू शकले. सध्याचे सरकार मात्र शेतकऱ्यांना संपवण्याच्या प्रयत्नात आहे. आम्हाला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून शेतकऱ्यांना पुन्हा सन्मान मिळावा, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि ते फक्त शरद पवार करू शकतात म्हणून मी आदरणीय पवार साहेबांसोबत उभा आहे.” असे मनोगत यावेळी संतोष गाडगीळ यांनी व्यक्त केले.
श्री संतोष गाडगीळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात ग्रामीण भागात भरघोस काम घडेल अशा शुभेच्छा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे यांनी यावेळी व्यक्त केल्या. श्री. संतोष गाडगीळ याना मानणारा मोठा वर्ग vengurla तालुका व सावंतवाडी परिसरात असून त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी ताकत मिळणार आहे.
सावंतवाडी, प्रतिनिधि