कणकवली नागवे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन करणार!
युवा सेनेच्या वतीने वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष
१५ फेब्रुवारी पासून काम सुरू करण्याची ठेकेदाराने ग्वाही दिल्याची माहिती
कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते स्वयंभू मंदिर पर्यंत जाणारा नागवे मुख्य रस्ता डांबरीकरणाचे काम मंजुर होऊन २ महिने होऊन देखील अजुन प्रत्यक्षात काम सुरु झाले नसल्याने युवा सेनेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची भेट घेत चर्चा केली व निवेदन देखील दिले. या रस्त्यावरुन नागवे-करंजे हरकुळ-फोंडा पंचक्रोशीतील नागरीक प्रवास करत असतात. त्यामुळे सदर रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या सर्व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता कणकवली शहरातील मुख्य रस्त्यापैकी एक प्रमुख रस्ता असल्यामुळे कृपया आपण जातीनिशी लक्ष घालून येत्या ८ दिवसात काम चालु करावे अन्यथा कणकवली ग्रामस्थांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुका समन्वयक तेजस राणे यांनी दिला आहे. दरम्यान 17 फेब्रुवारी 2023 पासून काम सुरू करण्याची काही ठेकेदाराने दिल्याची माहिती तेजस राणे यांनी दिली. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, विधानसभा प्रमुख सचिन सावंत,उपशहरप्रमुख वैभव मालडकर, युवा सेना उपशहरप्रमुख सोहम वाळके,शाखाप्रमुख संतोष राणे,सत्यवान राणे,महेश राणे,यश घाडीगावकर, अक्षय घाडीगावकर आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली