कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे ६ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न!” अभियान
जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती
शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी "होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!" हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.
६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी येथे छ. संभाजी राजे चौक, सायं. ४ वाजता देवगड, आणि सायं. ६ वाजता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे या कॉर्नर सभा होणार आहेत.
यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत,विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,राजू शेट्ये,नंदू शिंदे, मंगेश लोके, मिलिंद साटम,जयेश नर,सचिन सावंत,शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, प्रमोद मसुरकर, उमेश वाळके, राजू राठोड,उत्तम लोके, वैदेही गुडेकर, शिवाजी राणे, स्वप्नील धुरी,नलिनी पाटील,संतोष तारी, गणेश गावकर, हर्षा ठाकूर,सायली घाडीगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.
कणकवली, प्रतिनिधी