दोडामार्ग ते मुंबई शिवशौर्य यात्रा
यात्रेचा 30 सरप्टेंबरला दोडामार्गपासून प्रारंभ
दोडामार्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दोडामार्ग ते मुंबई’ अशी भव्य ‘शिवशौर्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशी राहणार असून दोडामार्गमध्ये ३० सप्टेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कोकण प्रांत या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवशौर्य यात्रा स्वागत समिती दोडामार्गचे अध्यक्ष श्रीगणेश गावडे यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रंगनाथ गवस, गुरुदास मणेरीकर, जयवंत आठलेकर, नीलेश साळगावकर, रामकृष्ण दळवी होते.
शहरातील सिद्धिविनायक मंदिरात ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सर्व शिवप्रेमी यात्रेसाठी एकत्र जमणार आहेत. तत्पूर्वी यात्रेसाठी बनविण्यात आलेला सुंदर व आकर्षक रथ दोडामार्गमध्ये दाखल होणार आहे. या रथाचे पूजन व अभिषेक होणार आहे. त्यानंतर यात्रेला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तसेच राज्याभिषेक सोहळा यांची माहिती येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरावी, हा मुख्य उद्देश या यात्रेनिमित डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. यात्रेचा मुंबईमधील दादर येथे १५ ऑक्टोबरला समारोप होणार आहे. या यात्रेला सावंतवाडी येथील लखमराजे भोसले, बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे, रत्नागिरी विभागाचे विभाग मंत्री विवेक वैद्य, सिंधुदुर्गचे जिल्हा मंत्री आनंद प्रभू आदी या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
यात्रेसाठी विशेष समिती असून अध्यक्षपदी श्रीगणेश गावडे, स्वागताध्यक्ष विवेकानंद नाईक, पालक जयवंत आठलेकर, यात्रा प्रमुख – मनोज वझे, मातृशक्ती प्रमुख – विनिता देसाई, धार्मिक कार्यक्रम प्रमुख गुरुदास मणेरीकर, सभाप्रमुख – मिलिंद नाईक, विशाल चव्हाण, नीलेश साळगावकर, प्रचार प्रमुख भूषण सावंत, रामकृष्ण दळवी, निधी संकलन प्रमुख रंगनाथ गवस, भोजन व्यवस्था प्रमुख श्रवणकुमार राजपुरोहित, यात्रामार्ग नियोजन प्रमुख संजय सावंत, सुरक्षा प्रमुख नीलकंठ फाटक, राकेश धर्णे, कृष्णा नाईक आदी आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग