चिंदर येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न……!
भाजप चारकोप(मुंबई) विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांचा पुढाकार
भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांच्या पुढाकाराने, चिंदर नागोचीवाडी युवक मंडळ मुंबई व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, गावातील माती कलशा मधून तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या माध्यमातून शहिदांच्या स्मारकासाठी दिल्लीला पोचवणार असल्याचे यावेळी योगेश पडवळ यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर गावचे उपसरपंच दिपक सुर्वे, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, कार्यक्रमाचे आयोजक चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष यदुनाथ पडवळ, सेक्रेटरी दत्तात्रय पडवळ, संतोष जाधव, रवि पडवळ, परेश मांजरेकर, प्रविण पडवळ, भक्ती पडवळ, योगिनी पडवळ, समिक्षा जाधव व देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचार