सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागामार्फत खारेपाटण येथे गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत

जिल्हा वाहतूक शाखा महिला पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी पुष्पगुच्छ देऊन गणेशभक्तांना दिल्या गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागामार्फत खारेपाटण येथे गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले .यावेळी खारेपाटण येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना जिल्हा वाहतूक शाखा महिला पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी पुष्पगुच्छ देऊन गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी जिल्हा वाहतुक शाखा मपोनि/रिजवाना नदाफ मॅडम पोहवा/रामदास जाधव,मपोहवा/वर्षा मोहिते,पोहवा/राहुल वेंगुर्लेकर खारेपाटण पोलीस दुरक्षेत्र चे अंमलदार पोना./उध्दव साबळे ,पराग मोहीते ,प्रशांत लोके आदी पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.खारेपाटण येथे गणेशभक्तांच्या स्वागतासाठी विविध सेवा सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. गणेशभक्तांच्या सेवेसाठी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच खारेपाटण-टाकेवाडी येथे मोफत सुविधा केंद्राची उभारणी केली असून ही सुविधा केंद्रे गणेशभक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत.येणाऱ्या गणेशभक्तांना कोणतीही अडचण असेल तर या सुविधा केंद्राच्या मदतीने त्यांची अडचण दूर केली जाणार असून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने ही सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत.यामध्ये पोलीस मदत केंद्र, वैद्यकीय सेवा केंद्र,विश्रांती कक्ष,चहा-बिस्कीट व्यवस्था, सुलभ शौचालय व्यवस्थेची गणेशभक्तांच्या सेवेसाठी उभारणी केली आहे. आरोग्य पथकांच्या वतीने गणेशभक्तांना कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या वैद्यकीय सेवा केंद्राच्या मदतीने सोडवण्यासाठी आरोग्य पथक देखील ठेवण्यात आले आहे.त्यामुळे कोकणात येणाऱ्या सर्व गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असणाऱ्या या सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!