सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर अनिकेत विनायक गुरव झाले रुजू

सावंतवाडी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर अनिकेत विनायक गुरव हे रुजू होणार आहेत. सावंतवाडी सालईवाडा मुळगाव सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे असून नुकतेच ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्येदाखल होणारं आहेत. एमबीबीएस (MBBS ) ही पदवी परदेशामध्ये चीन मध्ये घेऊन रुग्णसेवेमध्ये दाखल झाले आहेत.त्यांनी मिलाग्रीस स्कूलमध्ये शिक्षण घेऊन त्यानंतरचे शिक्षण पंचम खेमराज कॉलेज मध्ये २००७ साली शिक्षण घेऊन एमबीबीएस या शिक्षणासाठी परदेशामध्ये चीनमध्ये एमबीबीएस (MBBS) ही पदवी 2015 साली पूर्ण शिक्षण घेऊन नुकतेच ते सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत.डॉ. अनिकेत गुरव हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत दाखल झाल्याने त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी श्री राजू मसूरकर यांनी अभिनंदन केले.
रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी





