मालवण येथील रिक्षा व्यवसायकाची आत्महत्या

मालवण शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षाचालक संजय कृष्णा कोळंबकर (वय-४९) यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय कोळंबकर हे बस स्थानक परिसरात रिक्षा व्यवसाय करत असत. काल रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी घरातील सदस्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला (घुसता कोणताही आतून प्रतिसाद आला नाही, म्हणून त्यांचा भाऊ संतोष कोळंबकर यांनी आत पाहिले असता भाऊ संजय कोळंबकर यांनी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत. संजय कोळंबकर यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

error: Content is protected !!