वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

मसुरे – वडाचापाट प्राथमिक शाळा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले.
या प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई यांनी केले.
यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सविता पालव, विराज पाटकर, शामल मांजरेकर, दर्शना कासले, वेदिका माळकर, श्रीकांत पाटकर, विजय घाडीगावकर, रामचंद्र कासले, भानुदय कासले, दया देसाई, मुख्याध्यापिका सौ माळकर, शिक्षक सौ पालव, श्री पवार आदीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.