जिल्हाप्रमुख झाल्यावर संदेश पारकर यांची उद्धव ठाकरेंशी पहिल्यांदा भेट

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या श्री. पारकर यांना शुभेच्छा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख झाल्यावर श्री. ठाकरे यांची पहिलीच भेट असून, यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्री पारकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पक्ष वाढी संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. संदेश पारकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील एक आघाडीचे नाव असून त्यांच्या निवडीमुळे पक्षात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!