मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्क्वॅश क्रीडा प्रकारात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

वैभववाडी – मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन स्क्वॅश हा क्रीडा स्पर्धाप्रकार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारकोपर येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघामधून साक्षी रावराणे, वैष्णवी गायकवाड, गौरी रावराणे व गौरांगी काळसेकर यांनी सहभाग घेतला होता. या अंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत मुलींच्या संघातून त्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला, त्याचप्रमाणे या क्रीडा प्रकारासाठी कु. साक्षी रावराणे व वैष्णवी गायकवाड या दोघींची विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे, क्रीडा प्रशिक्षक अशोक पाटील, क्रीडा विभाग प्रमुख एस. बी. पाटील व सदस्य आणि अधीक्षक संजय रावराणे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील संस्था पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!